आयुर्वेदानुसार पृथ्वीवरील कोणताही सेंद्रिय किंवा नैसर्गिक पदार्थ हा पाच प्रमुख घटकांच्या संयोगाने बनलेला असतो. या पाच घटकांना पंचतत्वे असे म्हणतात. हे पाच महान घटक म्हणजे १. पृथ्वी, २. जल (पाणी), ३. अग्नि, ४. वायु (हवा), ५. आकाश.
मानवी शरीर देखील या पाच घटकांचे एक अद्भुत मिश्रण आहे. फरक एवढाच आहे की मानवी शरीरात 'चैतन्य' असते म्हणजेच एक अदृष्य शक्ती कार्यरत असते. त्या शक्तीला "आत्मा " म्हणतात.
मानवी शरीराला कार्यरत ठेवण्याचे काम मुख्यत्वे शरीरातील तीन दोष करतात. वात, पित्त आणि कफ हे तीन दोष संपूर्ण शरीर नियंत्रित करतात. वायू तत्वामुळे वात दोष तयार होतो. अग्नि या तत्वामुळे पित्त दोष तयार होतो. कफ दोष हा प्रामुख्याने पृथ्वी आणि जल तत्त्वांपासून बनलेला आहे. हे तीन दोष मन आणि शरीरातील सर्व सामान्य आणि असामान्य घटनांसाठी जबाबदार आहेत.
धातू : जे शरीर धारण करतात, जे शरीर बनवतात त्यांना धातू म्हणतात. आयुर्वेदात अशा सात धातूंचा उल्लेख आहे. 1. रसधातू, , 2. रक्तधातू, 3 मांसधातू, 4. मेदधातू, 5. अस्थिधातू, 6. मज्जाधातू, 7. शुक्रधातू
मल हा एक कचरा आहे जो शरीरातून काढून टाकला जातो. 1. घाम, 2. मूत्र, 3. मल यांना त्रिमल असे म्हणतात.
त्रिदोष, सप्तधातु आणि त्रिमल हे आयुर्वेदाचे तीन स्तंभ आहेत. ही आयुर्वेदाची तत्त्वे म्हणून ओळखली जातात.
LIMARK ने वरील सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून काही अप्रतिम आयुर्वेदिक मिश्रणे बनविले आहेत. आणि त्यातील बरीचशी उत्पादने आधुनिक अशा व्हॅक्यूम फ्रीझ ड्रायिंग प्रक्रियेने बनविली आहेत.
फ्रीझ ड्रायिंग ही अशी एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये कोणत्याही पदार्थाला सुकविण्यासाठी त्याला प्रथम आहे त्या स्थितीत गोठवले जाते. आणि मग त्यातील पाणी काढून टाकण्यासाठी पूर्णपणे गोठलेला पदार्थ निर्वात पोकळी मध्ये ( व्हॅक्यूम ) ठेवला जातो, ज्यामुळे पदार्थातील गोठलेले पाणी (बर्फ ) द्रव अवस्थेतून न जाता थेट घनतेपासून बाष्पात बदलू शकतो आणि मूळ पदार्थ सुकतो.
व्हॅक्यूम फ्रीझ ड्रायिंग प्रक्रियेचे फायदे
याचे ३ वेगवेगळे उपयोग आहेत. तीनही वेळा वापरण्याची पद्धत वेगळी आहे.
अनुपान (खाण्याची पद्धत) - - जेवणा आधी किंवा नंतर कोमट पाण्यातून दुपारी व रात्री १ - १ कॅप्सूल घेणे.
अर्जुन साल extract आणि गार्लिक Extract एकत्रितपणे कोणतेही हार्ट पेशंट घेऊ शकतात.
विशेषतः कोणत्याही आजारातून नुकतेच बरे झालेल्यांचा अशक्तपणा दूर करण्यासाठी उपयोगी आहे.
अनुपान (खाण्याची पद्धत) - सकाळ , दुपार व संध्याकाळी १-१-१ अशी तीन वेळा घ्यावी.
हाडे ठिसूळ असणारे , कॅल्शिअम deficiency असणारे तसेच कोणतेही हाडाचे ऑपरेशन झालेल्या लोकांना अतिशय उपयोगी . यासोबत सकाळच्या उन्हात ३० मिनिटे बसल्यास जास्त प्रभावी
अनुपान ( खाण्याची पद्धत ) - सकाळी १ आणि रात्री १ जेवल्यानंतर घेणे
अनुपान (खाण्याची पद्धत) - रात्री झोपण्यापूर्वी ( सकाळी उठण्याच्या किमान ८ तास आधी ) आणि जेवल्यानंतर किमान पाऊण तासानंतर कोमट पाण्यातून १ किंवा २ ( गरजेनुसार ) सुरुवातीला १ कॅप्सूल घ्यावी , फरक न पडल्यास २ कराव्यात. याचा वापर केल्याच्या १ ते २ दिवस सकाळी २ ते ३ वेळा शौचास होऊ शकते. २ दिवसानंतर अगदी चिकट स्त्राव बाहेर पडेल. हि नैसर्गिक क्रिया असून पचन संस्था पूर्ववत झाल्याचे लक्षण आहे.